कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि
कन्हान -भारतरत्न स्वर सम्राज्ञी , देशाची गायन कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांचं नुकतचं निधन झाले असून वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा या निधना नंतर संपुर्ण देशात शोकमय चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान गांधी चौक येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.
त्यांना उपचारा करिता ब्रीच कँडी रुग्णालयात भर्ती केले होते. उपचार सुरू असतांना त्यांची प्रकृती मध्ये सुधारणा झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसां पासून त्यांची प्रकृती पुन्हा खराब झाल्याने त्यांनी रविवार ला सकाळी ८ वाजुन १२ मिनटांनी ब्रीच कँडी रुग्णालय येथे अखेरचा श्वास घेतला.
स्वर्गीय लता मंगेशकर यांचा निधना नंतर संपुर्ण देशात शोकमय चे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान गांधी चौक येथे शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर ,मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे, सहसचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, सदस्य प्रकाश कुर्वे, चंदन मेश्राम, सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या