Advertisement

चंद्रपूर येथे बेरा टेस्ट मशीन उपलब्ध करा -विदर्भ विकलांग संघटनेची मागणी

चंद्रपूर येथे बेरा टेस्ट मशीन उपलब्ध करा -विदर्भ विकलांग संघटनेची मागणी

चंद्रपूर जिल्हा हा रोजगाराच्या दृष्टीकोनातून अतिशय संपन्न जिल्हा आहे . प्रत्येक व्यक्तीला काम आणि कामानुसार दाम मिळून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो आहे ,मात्र जिल्ह्यामध्ये बेरा टेस्ट मशीनच उपलब्ध नसल्यामुळे बेरा टेस्ट केल्याशिवाय कर्णबधीर लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकत नाही . प्रमाणपत्र नाही म्हणून शासनाच्या योजनाचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे बेरा टेस्ट मशीन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी विदर्भ विकलांग संघटनेने केली आहे.

दिव्यांग व्यक्तिकरिता अनेक संस्था काम करीत आहेत . पण दिव्यांग व्यक्तीवर कोणत्या अडचणी येतात , दिव्यांग व्यक्तीचे प्रमाण पत्र काढताना प्रकार निहाय वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात , फीजीओ थेरपी , ऑडीओ माट्री , बेरा टेस्ट , स्पीच थेरपी , इत्यादी चाचण्या करूनच त्या व्यक्तीच्या अपंगत्वाची टक्केवारी ठरविली जाते.

पण दुर्दैवाची बाब हि कि , चंदपूर सारख्या आर्थिक संपन्न अशा जिल्ह्यामध्ये बेरा टेस्ट मशीनच उपलब्ध नसल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामधून लोक गाड्या करून हि चाचणी करण्यासाठी गडचिरोलीला जातात. बेरा टेस्ट केल्याशिवाय कर्णबधीर लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकत नाही . प्रमाणपत्र नाही म्हणून शासनाच्या योजनाचा लाभ मिळत नाही , या दुहेरी चीमटयामुळे दिव्यांग व्यक्तीची होरपळ सुरु आहे, हि चाचणी तशी महाग असून सर्वसामान्य लोकांना खर्च झेपणारा नाही, तसेच आर्थीक अडचणी , प्रवाशी साधनाचा अभाव या सर्व कारणामुळे दिव्यांग व्यक्ती खूप मोठ्या संकटाना धैर्याने तोंड देताना दिसतो आहे.

तसेच चंद्रपूर जिल्हा विस्ताराने खूप मोठा असल्यामुळे दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र वितरण महिन्यातून एकदा उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी वाटप करण्याचा अभियान राबविला तर तळागाळातील दिव्यांग व्यक्तींना त्याचा फायदा होऊन प्रत्येक दिव्यांग व्यक्ती ही शासनाच्या योजनाची लाभार्थी ठरून योजनेचा लाभ घेईल, अन्यता या अडचणीमुळे अगदीच शेवटच्या टोकाला असलेले दिव्यांग व्यक्ती प्रवाशी साधनाचा अभाव, आर्थिक अडचण, मार्गदर्शनाचा अभाव , दिव्यांगाची तीव्रता या कारणामुळे ते जिल्हयाला जाऊन आपल्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करु शकणार नाही, या सर्व बाबीचा आणि दिव्यांग व्यक्तीचा विचार करून जिल्हा सामान्य रुगणालय चंद्रपूर येथे बेरा टेस्ट उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी महिन्यातून एकादा प्रमाणपत्र वितरणाचा शिबीर घेऊन दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ विकलांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .

प्रतिनिधी: राहुल भोयर ब्रम्हपुरी-चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या