Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून छत्रपती शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी

ब्रम्हपुरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती स्थानिक कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सुरज भाऊ शेंडे तालुका उपाध्यक्ष मंगेश फटींग हरिष हटवार ( माजी सैनिक ) शहर अध्यक्ष दिपक मेहर, रविंद्र देवगडकर चैतन्य मेगंटीवार चेतन मारबते आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

_यावेळी कार्यक्रमाचे संचालन रविंद्र देवगडकर तर चैतन्य मेगंटीवार आभार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश फटींग यांच्यासह मनसे चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे फळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या