वंचित आघाडी ची कार्यकर्ता बैठक संपन्न
ब्रम्हपुरी-वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आगामी काळात होऊ घातलेल्या पं.स.व जि.प निवडणुका संदर्भात ब्रम्ह्पुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडी ही निवडणुक पूर्ण ताकतीनिशी व स्वबळावर लढनार यासाठी शासकीय विश्रामगृह ब्रम्ह्पुरी येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा व नियोजन करण्यात आले.
यामध्ये पं.स व जि.प सर्कलनुसार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व संघटनात्मक बांधणीची जबाबदारी देण्यात आली. शिवाय इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात आला. बैठकीत प्रमुख मार्गदर्शक मा.सुखदेव प्रधान सदस्य , डॉ प्रेमलाल मेश्राम सल्लागार, अश्विन मेश्राम सहसचिव जिल्हा कमिटी हे उपस्थित होते. बैठकीचे नियोजन ता. महासचिव लिलाधर वंजारी यांनी केले. तर सुत्रसंचालन उपाध्यक्ष अनिल कांबळे व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष अरुण सुखदेवे यांनी केले.
यावेळी तालुका पदाधिकारी कमलेश मेश्राम, नरेंद्र मेश्राम, सुरेश बागडे, अनंतकुमार मेश्राम, डी एम रामटेके सर, वासुदेव गजभिये, प्रफुल ढोक, निहाल ढोरे, लक्ष्मण नेवारे, धर्मप्रकाश शेंडे, अशोक शेंडे, पांडुरंग लिंगायत, प्रकाश रामटेके, प्रधान साहेब नान्होरि, मालोजी रामटेके,महिला आघाडीच्या लिनाताई रामटेके, प्रमिला पाटील, मनीषा उमक, प्रीति हुमने , लता मेश्राम व ईतर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी:- राहुल भोयर, ब्रम्हपुरी/चंद्रपूर


0 टिप्पण्या