Advertisement

शेतावर जाऊन पिता पुत्राला जबर मारहाण

शेतावर जाऊन पिता पुत्राला जबर मारहाण

ब्रम्हपुरी- शहरातील शेषनगर येथे राहणारे सुधाकर राऊत यांची रामदेवबाबा सालवंट जवळ २ एकर शेती आहे. घटनेच्या दिवशी शेतीमालक सुधाकर राऊत हे त्यांचा मुलगा नामे विवेक राऊत याच्यासह जेसीबीच्या साहाय्याने धुरे काढीत  होते.

दरम्यान ब्रम्हपुरी येथील राहणारे सतिश उर्फ बंटी श्रीवास्तव हे त्यांच्या सहकारी सोबत राऊत यांच्या शेतीवर येऊन ही तुमची शेती नाही ,इथे धुरे काढू नका म्हणून शाब्दिक बाचाबाची केली. इतक्यात आरोपीचा लहान भाऊ मनीष श्रीवास्तव हा राधेश्याम मिश्रा व इतर ४-५ लोकांना घेऊन राऊत यांच्या शेतावर आला व शेतीमालक आणि त्यांच्या मुलाला जबर मारहाण केली.

या घटनेत पिता-पुत्राच्या हातापायाला, डोक्याला, पाठीवर तसेच ओठाला मार लागलेला सांगितल जात्या आहे. यावरून शेतीमालक यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून

आरोपीविरुद्ध अप. क्रं.६१२०२१ नुसार भांदवी कलम १४३,१४७,१४९,३२३,५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश रामटेके करीत आहेत.

प्रतिनिधी:- राहुल भोयर,(ब्रम्हपुरी-चंद्रपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या