Advertisement

छत्रपति शिवाजी महाराज इतिहासाची प्रेरणा देणारे सुवर्णपान

छत्रपति शिवाजी महाराज इतिहासाची प्रेरणा देणारे सुवर्णपान

ब्रम्हपुरी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडीभूषण श्रीमंत योगी रयतेचे राजे हे महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत असून सगळ्या मावळ्यांना सामावून घेऊन अखंडितपणे सुरू असणाऱ्या नदीतील प्रवाहच नव्हे तर कोणत्याही भावनेचा सुवर्णमध्य पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. असे मौलिक विचार अँड. आशिष गोंडाणे यांनी मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती व ग्रामवासी जनतेच्या संयुक्त विद्यमाने रणमोचन येथे दिनांक १ ९ फेब्रुवारी शनिवारला आयोजित शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी प्रवक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार गोवर्धन दोनाडकर तर वक्ते म्हणून उदयकुमार पगाडे सामाजिक कार्यकर्ते, पूनम कुथे , लक्ष्मण रावजी दोनाडकर , ग्रामपंचायत सरपंच्या नीलिमा राऊत यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सदाशिव ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान , घनश्याम मेश्राम , पोलीस पाटील अस्मिता पिलारे , पत्रकार विनोद दोनाडकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाजी पिलारे , ग्रामपंचायत सदस्य अश्विनी दोनाडकर,  मंदा सहारे , कोमल मेश्राम अंगणवाडी कार्यकर्त्या लक्ष्मी दोनाडकर आशा वर्कर माधुरी भरै आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय मेश्राम तर आभार पराग राऊत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव गुरनुले , होमराज नाकतोडे , संदीप मांदाडे , कोमल संगतसाहेब,  दीपक कावळे , राहुल मेश्राम ,  वैभव दोनाडकर यांच्यासह अनेक युवकांचे मोलाचे सहकार्य लाभले .

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या