Advertisement

पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी भाकपने केले रास्ता रोको आंदोलन

पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी भाकपने केले रास्ता रोको आंदोलन

ब्रम्हपुरी : गोंदिया चंद्रपूर बल्लारशा या रेल्वे मार्गावर पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात यावे व इतर मागण्यांकरिता वारंवार रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून ही दखल घेण्यात न आल्याने शेवटी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे लाखांदूर ब्रह्मपुरी टी पॉइंटवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवार 21 फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

सदर आंदोलन चे नेतृत्व काम्रेड विनोद झोडगे , काम्रेड शिवकुमार गणवीर, काम्रेड महेश कोपुलवार, काम्रेड हंसलाल रांगडाले, प्राध्यापक नामदेव कन्नाके, देवराव चवडे, मिलिंद गणवीर,अँड जगदीश मेश्राम,विनोद राऊत यांनी केले.

कोरोना काळात रेल्वे गाड्या बंद होत्या त्यामुळे प्रवाशांची धावपळ होत होती . रेल्वे गाड्या सुरु करा ही मागणी घेऊन भाकप च्या वतीने सौंदड येथे 15 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत 28 सप्टेंबर रोजी गोंदिया चंद्रपूर बल्लारशा रेल्वे गाडी प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू करण्यात आली. मात्र फेऱ्यांची संख्या येणे-जाणे एकच असल्यामुळे अनेकांना वेळेवर ठरलेल्या ठिकाणी पोहोचता येत नाही.

त्यामुळे गोंदिया चंद्रपूर बल्लारशा रेल्वे मार्गावर कोरोना पूर्वकाळात रेल्वे फेर्‍या सुरू होत्या त्या सर्व पूर्ववत सुरू करण्यात यावे या त्याचप्रमाणे कोरबा- हैदराबाद, विलासपूर- चेन्नई, दरभंगा- हैदराबाद हैदराबाद -रॅकसोल, गया- चेन्नई , जसोडी- वास्को दि गामा या गाड्यांना वडसा, सौंदड स्टेशन वर थांबा देण्यात यावा. एक्सप्रेस गाड्यावर वरिष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादींना मिळणारी सवलत पूर्ववत देण्यात यावी, तिकिटाचे दर पूर्ववत करण्यात यावे, वडसा गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे , ब्रह्मपुरी रेल्वे फाटक यावरील उड्डाण पुलाचे काम त्वरित करण्यात यावे.

आदी मागण्या करिता चंद्रपूर-गडचिरोली भंडारा गोंदिया भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या वतीने संयुक्त रास्ता रोको आंदोलन वडसा येथे करण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रबंधक यांना देण्यात आले आणि येत्या हप्ता भरात पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या पूर्ववत सुरू न झाल्यास मार्च महिन्यात तीव्र रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .या आंदोलनाला समाजवादी पक्षाचे नेते इलियास पठाण,प्रहार संघटनेचे अँड हेमंत उरकुडे ,समता सैनिक दलाचे जयप्रकाश धोंगडे यांनी पाठिंबा दिला . या आंदोलनात मोठ्या संख्येने ब्रम्हपुरी तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रतिनिधी राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या