Advertisement

स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत विशेष सवलतीत

स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत विशेष सवलतीत

आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांचा मावळवासियांसाठी सुप्त उपक्रम

वडगाव मावळ (पुणे)- नवलाख उंबरेगावचे आदर्श सरपंच,स्वयंभू फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पडवळ  व मुंबईतील नामवंत डॉक्टर टी. एस. भाल यांच्या सुसज्ज सेवाभावी हॉस्पिटल मध्ये विविध आजारांवर शस्त्रक्रिया  विशेष सवलतीत व मोफत देण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त गरजु लोकांनी संधीचा लाभ घ्यावा असे दत्तात्रय पडवळ यांनी आव्हान केले आहे.

विविध आजारांमध्ये हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया, मणक्याच्या सर्व शस्त्रक्रिया,अन्ननलिका शस्रक्रिया यकृताचे आजार शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया, सांध्याच्या शस्तरक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा, अपेंडिक्स, हायड्रोसिल शस्रक्रिया,डोळ्यातील सफेत पडद्याची शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया ,मुतखडा शस्त्रक्रिया,कान नाक व घसा शस्त्रक्रिया,जीभेच्या शस्रक्रिया,हार्निया,किडनीचे आजार,श्वासनलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया,पौरुष ग्रंथी वाढणे ,मूत्राशयाचा मार्ग संकुचित होणे,गर्भपिशवी दुरुस्ती,पित्ताशयातील खडे शशस्त्रक्रिया अशा अनेक प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया होणार आहेत.

हा उपक्रम आमदार सुनिल शेळके  व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  बापुसाहेब भेगडे यांच्या

मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असल्याचे पडवळ यांनी माहिती सादर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या