Advertisement

वंचित बहुजन महिला आघाडी कडून शिक्षणाधिकारी, यांना तहसीलदार ब्रम्हपुरी मार्फत दीले नीवेदन

वंचित बहुजन महिला आघाडी कडून शिक्षणाधिकारी, यांना तहसीलदार ब्रम्हपुरी मार्फत दीले नीवेदन

ब्रम्हपुरी :- वंचित बहुजन महिला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे मा. शिक्षणाधिकारी, यांना तहसीलदार ब्रम्हपुरी यांचे मार्फत नीवेदन सादर केले. उच्च शिक्षणाचे समानिकरण नावावर राष्ट्रीय शिक्षण नीतीचे षडयंत्र, दिलेला मसुदा मान्य का नाही, देशातील उच्च शिक्षणाचे कवाडे खुली करणारी शिक्षणनीती या नावाखाली केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’, येत्या वर्षात लागु करणार आहे. शिक्षणाचे आधुनिकरणाच्या, समानिकरणाच्या नावावर शिक्षणाचा बाजार मांडण्याचा डाव आहे.

दिलेला मसुदा मान्य का नाही आणी हा लागु करून गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याचा वंचित बहुजन महिला आघाडी कडुन जाहीर निषेध व्यक्त करीत आहो. हा मसुदा लागु केल्यास तीव्र आंदोलन केल्या जाईल.

असा इशारा वंचित बहुजन महिला आघाडी च्या तालुका अध्यक्षा लीनाताई रामटेके यांनी यावेळी दीला. यावेळी महिला तालुका अध्यक्षा लीनाताई रामटेके, कार्यकर्त्यां प्रतीमा डांगे, लता मेश्राम, प्रीती हुमणे, शारदा घोनमोडे, शीतल गायकवाड, मृणालीनी सहारे, जास्वंदा घुटके, करूणा मेश्राम, प्रमीला पाटील, कीरण मेश्राम, अर्चना गणवीर, नीरूलता बन्सोड सुकेशनी बन्सोड, व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या