Advertisement

जासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघर्ष अकॅडमी च्या माध्यमातून पोलीस विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा

जासत्ताक दिनाचे औचित्य साधून संघर्ष अकॅडमी च्या माध्यमातून पोलीस विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा

शहापूर,किन्हीवली (दि.26 जानेवारी-2022)

प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून ज्या विद्यार्थ्यांची  संघर्ष अकॅडमी च्या माध्यमातून व प्रा. सुनिल केदार यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपली पोलिस म्हणून निवड झालेली आहे त्या सर्व पोलीस विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला.

या गुण गौरव सोहळ्या निमित्त अनेक विद्यार्थांना पुढे प्रोत्साहन मिळावे व या अकॅडमी मार्फत जे शिक्षण घेत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश ठेवून हा गुण गौरव सोहळा ठेवण्यात आल्याचे प्रा. सुनिल केदार सरांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिन आणि या अकॅडमीचा उद्देश पहिला तर देशाला हवा असणारा एक महत्वाचा भाग म्हणजे पोलिस! ह्या पोलिसाना घडविण्याचा काम ही संघर्ष अकॅडमी करत असून हे फार मोठे अभिमानाचा गौरव आहे.

तरी या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या गुण गौरवाच्या सोहळ्यास ज्या आमदार व खासदार यांनी येऊन त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे ते या कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात हीच मोठी खंत असल्याचे विद्यार्थ्यामध्ये चर्चा रंगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या