प्रेरणा फाऊंडेशनचा ७३ वा प्रजासस्ताक दीनी, ट्रेन मध्ये सापडलेल्या हॉस्पीटल मध्ये दाखल झालेल्या! अनाथआजी सोबत तसेच १००रुग्णांना मास्क वाटप करून साजरा
रेल्वेत मिळाल्या एका वृद्ध आजीला जीवन दान मिळाले आहे. बेवारश असून संपर्क साठी उल्हासनगर पोलिस ठाण्यात चौकशी करावी.
उल्हास नगर सरकारी रुग्णालयात प्रेरणा फाऊंडेशन अंतर्गत उपचार सुरू असणाऱ्या अनाथ आजीला कपडे खाऊं व तीच्या चौकशी साठी प्रेरणा फाऊंडेशन संस्थापिका दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर,सचिव वैभव कुलकर्णी, खजिनदार दिव्या गावकर व सभासद रोहन गावकर यांनी हॉस्पीटल ला भेटत दिली.
आजीची अवस्था अतिशय गंभीर असुन ती बेड वर सुद्धा बसण्याच्या अवस्थेत आढळली नाही.
संस्थापिका प्रेरणा गावकर, सचिव वैभव कुलकर्णी व रोहन गावकर यांनी तिला कपडे घातले. खाऊं, चहा, काही कपडे,जेवणं दिले. परंतु हॉस्पीटल मध्ये अशी काही विशेष काळजी घेतली जात नाही. एक माता मात्र येथील अनाथ आजींची काळजी घेताना आढळली तिची मुलगी तिथे कोमा अवस्थेत असल्याने गेले दोन महिने ती आपल्या मुलीची सेवा करतं व हॉस्पिटल मधील पेशंट चे अन्न खात इतरही अनाथांना मदत करत होती.
ठीकठीकानी प्रजासत्ताक व स्वतंत्र दिनाच्या घोषणा व झेंडे फडकवणाऱ्या नागरिकांच्या या व्यथा आहेत. एक समाधान म्हणजे कुठेतरी रस्त्यात पडून कुडकुडत जिवी गमावण्या पेक्षा त्या सरकारी हॉस्पिटल मध्ये ती दोन वेळचे अन्न खातेय व छता खाली जीवन जगतेय. हॉस्पिटल मध्ये अश्या एकूण ८ आजी आढळल्या. आजीने आपले नाव निर्मल जोषफ सराफ असे सांगीतले असुन त्यांनी आपला मुलगा डोंबिवलीला रहातो व बँकेत मॅनेजर आहे व सुनेने व मुलाने मला घराबाहेर हाकलले अशी माहिती सांगितली.
परन्तु आजी आपल्याला मदत करणाऱ्या दीप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर व वैभव कुलकर्णी यांना ओळखू शकल्या नाहीत. प्रेरणा फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देउन बऱ्याच रुग्णाची विचार पुस करत सरकारी रुग्णालयातिल १०० रुग्णांना मास्क वाटप केलं.या साठी मिलींद फाऊंडेशन चे अनमोल सहकार्य लाभले. मा.डॉ.मिलिंद आंबेरकर व मिताली आंबेरकर यांचे मनपुर्वक मनपुर्वक आभार व्यक्त.
संस्थापिका दीप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर यांनी केले.उल्हास नगर सरकारी हॉस्पिटल मधे अनाथ आजीला आजीच्या शोधात प्रेरणा फाऊंडेशन व पोलीस प्रशासन आहे .आजीची माहिती असल्यास संपर्क साधा.प्रेरणा ९३७०८००८४२
प्रेरणा फाऊंडेशन गोरगरीबांच्या सेवेत नेहमीच कुवतीप्रमाणे तत्पर असेल. असे आश्वासन प्रेरणा गावकर यांनी दिले.



0 टिप्पण्या