Advertisement

भोयरे येथे स्वर्गीय सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाण मावळ व PBMA’S एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय आणि आरोग्य सहकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न

भोयरे येथे स्वर्गीय सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाण मावळ व PBMA’S एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय आणि आरोग्य सहकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न

वडगाव मावळ(पुणे)-मावळ तालुक्यातील भोयरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे फाटा येथे   स्वर्गीय सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाण मावळचे संस्थापक-अध्यक्ष नवनाथ तानाजी पडवळ यांच्या वतीने व PBMA’S एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय आणि आरोग्य सहकार संस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात २१८ लोकांनी सहभाग घेऊन त्यांची विविध आजारांवर तपासणी करण्यात आली. तसेच पुढील उपचारांकरिता स्वर्गीय सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाण मावळचे संस्थापक-अध्यक्ष नवनाथ तानाजी पडवळ यांच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या  शोभा सुदाम कदम,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, नवनाथ तानाजी पडवळ,भोयरे ग्रामपंचायतचे सरपंच बळीराम भोईरकर, निगडे गावच्या सरपंच सविता भांगरे,देवा गायकवाड,जिल्हा परिषद टाकवे- वडेश्वर गणाध्यक्ष नवनाथ बळवंत पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान दरेकर,  पोलीस पाटील मंगेश आडिवळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामभाऊ भोइरकर, डॉ.तुषार जगणाडे,  महेश धामणकर, डॉ.गणेश शिंदे, डॉ.निलेश चांभारे, डॉ.निलेश आहेर, डॉ.शेख , तुकाराम महाराज  भांगरे, आंदर मावळ महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा  सुवर्णा घोलप ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष माणिक शेठ तांबोळी, आंबळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत घोलप, समीर कदम, प्रसाद कदम,गुरु घोलप ,रवींद्र वायकर, राजेश पानसरे, अमित शिंदे, दीपक दरेकर आदि उपस्थित होते.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव,मावळ-पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या