गाव गर्डापार त भिवापूर येथे जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला
पलिता बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १० /१२/२०२१ ला गाव गर्डापार त. भिवापूर जिल्हा नागपूर येथे जागतिक मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे आयोजक श्री विनोद पवार NRC ईकोनेट समन्वयक व पॅरालिगल कार्यकर्ता सौ ललिता कुळमते , सौ सरोज बोरकर कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुत्रसंचलन सौ ललिता कुळमते यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शन श्री विजय कारेमोरे यांनी केले समाजाला संविधानिक मानव अधिकार काय आहे समजवून सांगितले. त्याचबरोबर श्री राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संविधानात काय अधिकार आहे त्याबद्दल मार्गदर्शन केले, त्याचबरोबर श्री विनोद पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विजय कारेमोरे (सरपंच ग्रामपंचायत पाहमी) सौ सुनंदा पवार (उपसरपंच ग्रामपंचायत पाहमी) श्री धनराज पवार (अध्यक्ष शिक्षण व्यवस्थापन समिती) श्री.राठोड शिक्षक (जिल्हा परिषद शाळा गर्डापार) श्री.समिर पडोळे सौ कविता म्हैसकर, अंगणवाडी सेविका व गावातील नागरिक उपस्थित होते


0 टिप्पण्या