Advertisement

वराळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करून रक्तदान शिवीर संपन्न

वराळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करून रक्तदान शिवीर संपन्न

वडगाव-मावळ (पुणे)_भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाण मावळ, संस्थापक अध्यक्ष नवनाथ तानाजी पडवळ , यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ तरुण मंडळ, काशिनाथ प्रतिष्ठाण वराळे व नवविकास तरुण मंडळ नाणोली आणि सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाण यांच्या वतीने मैत्रेय बुध्दविहार, वराळे येथे  रक्तदान शिबीर राबवून अनोख्या पद्धतीने डॉ.बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. रक्तदान शिबीरास युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवून २७ जनांनी रक्तदान केले.

यावेळी   सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ तानाजी पडवळ , जेष्ठ नेते अनिल भांगरे , आर.पी.आय अध्यक्ष सुनिल पवार , नानोली गावच्या सरपंच मोनिका स्वप्निल शिंदे , अश्विनी विवेक शिंदे, अध्यक्ष नवनाथ ब.पडवळ , सोनवणे मेजर, वराळे गावाचे माजी सरपंच निलेश संभाजी मराठे,  सरपंच मनीषा शिंदे  विवेक शिंदे ,ग्रा.प. सदस्य निलेश दत्तात्रय मराठे , गणेश मराठे, अंकुश शिंदे , संकेत जगताप, प्रसाद शिंदे, सागर शिंदे, सुमेध शिंदे, शुभम जगताप, राहुल शिंदे, आकाश शिंदे, ऋषीकेश पवार, तुषार शिंदे, संतोष शिंदे, अनिकेत जगताप, ओंकार बोर्हाडे, सोमनाथ मराठे, प्रतिक जगताप, पिं.चिं. रक्तपेढीचे डॉ.समीर जमादार आणि सस्त टीम उपस्थित होते.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव, मावळ-पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या