नवोदय जनोत्थान संघटन कन्हान तर्फे जागतिक दिव्यांग दिवसा निमीत्त नगर परीषद चा दिव्यांग निधि करीता घेराव
दिनांक 3/12/2021 शुक्रवार ला नवोदय जनोत्थान संघटन कन्हान तर्फे जागतिक दिव्यांग दिना निमीत्त कन्हान शहरातील सर्व विकलांगाना पोलिस स्टेशन कन्हान चे निरीक्षक काळे साहेब व संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था तर्फे दिव्यांग कल्याण योजना अंतर्गत ५% निधि राखिव ठेऊन त्याच वर्षी खर्च करने अपेक्षित आहे.

परंतु असे झाले नसल्यास नवोदय जनोत्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या नेतृत्वात नगर परीषद कन्हान च्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरीता गेले असता, मुख्यअधिकारी उपस्थित नसल्यास त्यांच्या खुर्चीला निवेदन लावण्यात आले. ग्राम पंचायत चे नगर परीषद मध्ये विलिनीकरन होऊन ७ वर्ष पूर्ण झाले असुन फक्त सन २०१७-२०१८व २०१८-२०१९ ची दिव्यांग निधि मिळाली.
शिल्लक ५वर्षाची निधि करीता निवेदन देण्यात आले.न.प. कन्हान चा घेराव करण्यात आला. निवेदन देतांनी उपस्थित संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदिप बावने, सह सचिव अभिजित चांदुरकर, कोषाध्यक्ष सतीश उके, सदस्य मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे ,प्रवीण माने, सोनु खोब्रागडे, अश्विन भिवगडे, सागर फरकाडे,जयंत थोडा, जैश रामटेके, अब्दुल रहीम, बबन पटेल, कमलसिंग ईन्वाते, बबिता सावरकर, प्रकाश मानवटकर,स्वप्निल मेश्राम, आकाश खोब्रागडे,दिव्यांग बंदु उपस्थित होते.



0 टिप्पण्या