१ कोटी ६१ लाख रुपयांचा करंजगाव-पाले गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनील शेळके यांच्याकडून निधी उपलब्ध
वडगाव मावळ (पुणे)- नाणे मावळातील करंजगाव-पाले या ग्रामपंचायतसाठी दोन्ही नळ पाणी पुरवठा या योजनेसाठी आमदार सुनील शेळके यांनी १ कोटी ६१ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
काही दिवसापासून ग्रामीण भागातील अनेक गावे,वाड्या वस्त्यावरील नागरिकांची पाण्याची गैरसोय थांबविण्यासाठी तसेच पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी मावळची आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठवला होता तसेच शासनाकडे सतत पाठपुरावा देखील केला होता त्या पाठपुराव्याला यश येऊन विविध ठिकाणी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
करंजगाव ग्रुप ग्रामपंचायत मध्ये साबळेवाडी, मोरमारवाडी, ब्राह्मणवाडी या वाड्यानमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा मिटला आहे या ठिकाणी घरोघर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
यावेळी कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके,मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सुवर्णा राऊत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य ज्योति मालपोटे,उमा शेळके, नवनाथ पडवळ, देविदास गायकवाड, माजी सरपंच साईनाथ गायकवाड,संदीप आंद्रे, सचिन कदम,कल्पेश मराठे, समीर सुदाम कदम आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या