Advertisement

युवकांनी प्रथमतः स्वतःला स्वावलंबी बनवा,नंतर मैदानी खेळ खेळावे शरीर सुदढ बनेल-माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ

युवकांनी प्रथमतः स्वतःला स्वावलंबी बनवा,नंतर मैदानी खेळ खेळावे शरीर सुदढ बनेल-माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ

वडगाव-मावळ(पुणे)- भोयरे येथे सुरु असलेल्या भोयरे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन  माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते पार पडले. तरुणांनी शेती,शिक्षण, नोकरी याला प्रथम प्राधान्य द्यावे नंतर मैदानी खेळ क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल फुटबॉल खो खो इ. खेळ खेळावे जेणे करून शरीराचा व्यायाम होईल असे दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.

माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ म्हणाले तरुणांना कुठे रोजगार संधी उपलब्ध नसेल किंवा काही अडचण येत असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावू असे ह्या वेळेस सांगितले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शंकर मोढवे,अमोल वाळूंज,विक्रम भोईरकर, गणेश पवळे, दौलत अडीवळे,आदेश भोईरकर,चेतन भोईरकर आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या