वडगावमध्ये काशी विश्वनाथ लोकधाम लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
वडगाव मावळ (पुणे): वडगाव येथील श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या काशी विश्वनाथाच्या लोकधामाचा लोकार्पण सोहळा मावळ तालुका भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री संजय भेगडे माजी आमदार दिगंबर भेगडे,
श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपान म्हाळस्कर, तुषार महाराज दळवी, सुखदेव महाराज ठाकर, दिलीप महाराज खेंगळे, गणेश महाराज जांभळे, गोपीचंद महाराज कचरे,संतोष महाराज कुंभार संदेश शेलार नंदकुमार भसे, मावळ तालुका भाजप प्रभारी भास्कर म्हाळसकर,माजी पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर ,नगरसेवक दिनेश ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सुनील महाराज वरघडे व प्रभारी अनंता पुढे यांनी केले.
प्रतिनिधी: सुखदेव जाधव,मावळ-पुणे
0 टिप्पण्या