Advertisement

पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत अजित करवंदे यांना सुवर्णपदक

पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत अजित करवंदे यांना सुवर्णपदक

वडगाव मावळ( पुणे): संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य बी. बी. ए. महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अजित जालिंदर करवंदे यांनी नुकताच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून यश संपादन केले.

पुणे जिल्हा आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा बारामती येथील एम. एस.काकडे महाविद्यालयांमध्ये संपन्न झाली या स्पर्धेत अजित करवंदे याने 125 वजनी गटांमध्ये फ्री स्टाइल कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला यापूर्वी विंचर वेल्हा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सिल्वर पदक मिळवले होते.

अजित हा शेतकरी कुटुंबातील एक विद्यार्थी आहे त्याचे आजोबा स्वर्गीय तानाजी करवंदे यांचे स्वप्न तो सतत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे गेल्या काही दिवसापासून कात्रज येथील अर्जुन वीर पुरस्कार विजेते पैलवान काकासाहेब पवार यांच्या तालमीत तो सराव करत आहे.

या कुस्ती स्पर्धेसाठी कला वाणिज्य बीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी.जाधवर , क्रीडा विभागाचे प्रा.योगेश जाधव तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचे मार्गदर्शन केले.
पुढील काळात ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी अजित याची निवड झाली आहे.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या