मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या नगर पंचायत निवडणुक २०२१ करिता स्थानिक आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मुरबाडकरांकडून लाभला उदंड प्रतिसाद
या निवडणुकीसाठी शिवसेना १०तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३ जागांवर आघाडी करून लढत आहेत
मुरबाड शहराच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांत जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून २६ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी दिल्याचे नमूद केले. सत्ता कुणाची हे कधीच न पाहता विकासकामांसाठी निधी देऊनही शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर यापुढे याबाबत आपण अधिक दक्ष राहू असेही स्पष्ट केले.
खऱ्या अर्थाने मुरबाड शहराचा सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला संधी देण्याची विनंती स्थानिक मतदारांना केली. ही संधी मिळाली तर शहराचा संपूर्ण कायापालट करून दाखवू असेही आश्वासन दिले.
नगरविकास विभागाच्या माध्यमातून रस्ते, पथदिवे इतर विकासकामे यासाठी भरीव निधी देऊ असे आश्वस्त करित मुरबाड नगर पंचायत इमारतीच्या उभारणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, ठाणे ग्रामीण युवासेना प्रमुख प्रभूदास नाईक, शिवसेनेचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
प्रतिनिधी: राजेश भांगे,मुरबा-ठाणे



0 टिप्पण्या