Advertisement

कशाळगाव येथील ग्रामदैवत श्री मळुबाई मंदिर परिसरामध्ये काँक्रीटीकरण कामाचे भुमिपुजन संपन्न

कशाळगाव येथील ग्रामदैवत श्री मळुबाई मंदिर परिसरामध्ये काँक्रीटीकरण कामाचे भुमिपुजन संपन्न

वडगाव मावळ (पुणे) आंदर मावळ मधील कशाळगाव येथील ग्रामदैवत श्री मळूबाई मंदिर परिसरामध्ये कॉंक्रिटीकरनासाठी  पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर,माजी आदर्श सरपंच दत्ताञय पडवळ, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड ,माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड, नरहरी महाराज केदारी,माऊली जांभुळकर,धोंडीबा घोजगे,माजी सरपंच विठ्ठल जाधव,माजी आदर्श सरपंच शरद जाधव,माजी उपसरपंच तुकाराम जाधव, चेअरमन धोंडु जाधव,मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य सविता मदगे, माजी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामदास जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास जगताप, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव, श्री मळुबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत जाधव, कार्याध्यक्ष नरेश जाधव, सहसचिव मंगेश जाधव, दासु शिंदे, यशवंत जाधव, संतोष जाधव,राजु जाधव, शंकर जाधव, सोमनाथ जाधव,दिलीप जाधव, रुपेश जाधव, गबळु जाधव,रामा जगताप,नितिन जगताप ,सोमनाथ आडिवळे, कांताराम मदगे, शुभम करवंदे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी उपसरपंच तुकाराम जाधव व माजी सरपंच विठ्ठल जाधव   यांनी केले  तर आभार श्री मळुबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी मानले.

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या