Advertisement

सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुशीपाडा शाळेत शालेय मुलांसाठी साहित्य वाटप

सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुशीपाडा शाळेत शालेय मुलांसाठी साहित्य वाटप

सुरगाणा तालुक्यातील भुशीपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक २५/१२/२०२१ रोजी शालेय मुलांसाठी साहित्य वाटप करण्यात आले.

नाताळ सणाचा योग साधून अहमदनगर जिल्हातील अकोले तालुकातील पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी श्री अरविंद कुमावत व बीट शिक्षण अधिकारी श्री बबनराव निघू यांचे हस्ते शालेय मुलांसाठी साहित्य करण्यात.

व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चास तालुका अकोले येथील प्राथमिक शिक्षक तसेच राशा गावचे जावई श्री तूरनर भास्कर सोमा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटत करण्यात आले. या आदिवासी भागातील मुले शिक्षण प्रवाहात हुशार आणि सुजाण नागरिक व्हावीत यासाठी अशा प्रकारे योगदान देण्याचा प्रयत्न केला.

याप्रसंगी श्री सदाशिव आरोटे व राजेंद्र देवकर हजर होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुशीपाडा शाळेचे मुख्याध्यापक जाधव, श्री राऊत, इंगळे सर यांनी नियोजन केले.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ जोपुळे, सुरेश जोपुले, मधू जोपूळे, ईश्वर जोपूले, पालक , महिला भगिनी हजर होते. या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम सांगता झाली.

प्रतिनिधी:- किशोर जाधव, सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या