वराळे येथील दत्त मंदिरचे जीर्णोद्धार व भूमिपूजन सोहळा संपन्न
वडगाव मावळ (पुणे)- वराळे येथील दत्त मंदिराचा मावळचे आमदार सुनील शेळके,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे, पी.डी.सी.सी. बँकेचे नवनिर्वाचित संचालक माऊली दाभाडे, पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते दत्त मंदिराचा जीर्णोद्धार व भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मारुती मंदिरासाठी बाबुराव वायकर यांच्या फंडातून १० लक्ष रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला.
तसेच वराळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील ८ दिवसाच्या आत हा निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे,निलेश संभाजी मराठे, माजी उपसरपंच रोहिदास मराठे, विशाल मराठे, गुरुवर्य शंकर महाराज मराठेगणेश मराठे, सुदामभाऊ कदम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ तानाजी पडवळ माजी ग्रामपंचायत सदस्य राम मराठे,शहाजी मराठे,,बाळासाहेब मराठे,कल्पेश मराठे,अतुल मराठे,गणेश थिटे,प्रवीण मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच विश्वनाथ मराठे यांनी यांचे मारुती मंदिरासाठी १० लक्ष, गावच्या विकासकामांसाठी ५० लक्ष तसेच यापूर्वी ही रस्तासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सभापती बाबुराव वायकर यांचे आभार मानले.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या