Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कन्हान शहर विकास मंच पदाधिऱ्यांचे कन्हान पोलीस निरीक्षक मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कन्हान – कर्नाटक राज्यात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही अपराध्यांनी विटंबना करुन अवमान केल्याने कन्हान येथे या घटनेचा जाहिर निषेधार्थ कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत राष्ट्रपति ला निवेदन पाठवुन दोषियांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बेंगळुरु येथील सदाशिव नगर येथे  गुरुवार आणि शुक्रवार च्या मध्यरात्री काही अपराध्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकुन अवमान करुन विटंबना केली असुन सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने सर्व शिव प्रेमींनी या घटनेचा विरोधात दुख व्यक्त केले.

ठिकठिकाणी रोष व्यक्त केला जात असल्याने कन्हान येथे याचा जाहिर निषेधार्थ कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत राष्ट्रपति यांना निवेदन पाठवुन दोषियांवर प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , प्रकाश कुर्वे , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , शाहरुख खान , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या