नाणे मावळतील नाणे- गोवित्री मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न
वडगाव मावळ (पुणे)- नाणे मावळ मधील नाणे गोवित्री मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पुणे जिल्हा महानगर नियोजन या मार्फत ६ कोटी रुपये भरघोस निधी उपलब्ध केला आहे.याच मुख्य रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले.
बऱ्याच वर्षापासून रस्त्यात खड्डे, रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याकारणाने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता नाणे मावळ येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा करून या रस्त्याचे मुख्य रस्त्याचे काम मार्गी लावण्यात त्यांना यश आले.
आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील सर्वच भागांमध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे.
यावेळी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गणपत शेडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड,विजय गायकवाड, माजी सरपंच साईनाथ गायकवाड, माजी सरपंच भाऊसाहेब दाभणे, देविदास गायकवाड, मधुकर वाघुले, नारायण मालपोटे, सरपंच संगीता ज्ञानेश्वर आढारी, माजी सरपंच अनिल मालपोटे,नारायण मालपोटे, उपसरपंच नितीन अंबिके, पोलीस पाटील दत्तात्रय वाल्हेकर, दत्ता म्हाळकर, सोमनाथ आंद्रे, ग्रामपंचायत सदस्य संदीप आंद्रे, दिलीप आंद्रे, सोमनाथ दळवी, गजानन शिंदे, आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या