कन्हान गहुहीवरा चौक चाचेर मार्गावरून कोळसा व रेतीचे ओव्हर लोड जड वाहतूक कोन्क्रीट चे मोठे दगड टाकून बंद: कन्हान नगर अध्यक्षा सौ.करुणा आष्टनकर

आज दिनांक ०२ डिसेंबर २०२१ रोजी कन्हान गहुहीवरा चौक चाचेर मार्गावरून कोळसा व रेतीचे ओव्हर लोड जड वाहतूक सुरु झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात अपघाताची दाट शक्यता होती व त्यामुळे वाहतुकीस त्रास निर्माण होत होते. त्यामुळे मा.आ.अॅड.आशिषजी जयस्वाल, आमदार, रामटेक विधानसभा क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली सदर मार्ग गेल्या काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्याठिकाणी २ पोलीस कॉन्स्टेबल ची नेमणूक करण्यात आली होती.
परन्तु सदर वाहतूक हि सुरुच होती. दिनांक २४/१०/२०२१ रोजी गहूहिवरा मार्गावरून वाहत असलेले कोळसाचे ट्रक नं. MH 40 CD 5544 चा टक्कर ने श्री. राजेंद्र कुंडलिक कोचे यांचे अपघात झाला असून त्यांचे उजव्या पायाची ४ बोटे कटली गेली व डोक्याला गंभीर जखम झाले.
नगराध्यक्षा न प कन्हान पिपरी यांचे द्वारे पोलीस स्टेशन कन्हान ला वारंवार मौखिक सांगून सुद्धा वाहतूक बंद झालेली नाही त्यानुषंगाने स्थानिक नागरिकांचे मौखिक तक्रारी नुसार नगराध्यक्षा न प कन्हान पिपरी सौ. करुणा अनिल आष्टनकर व शिवसेना पक्षाचे कार्यकर्त्यां सह आज सदर मार्गावर कॉंक्रीटचे पिल्लर रचून वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली.या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित श्री. समशेर पुरवले, श्री. शैलेश दिवे, कु. शुभम येलमूले, स्थानिक नागरिक व इतर शिवसैनिक उपस्थित होते.



0 टिप्पण्या