Advertisement

पळसगाव केंद्रात जागतिक समता सप्ताह साजरा

पळसगाव केंद्रात जागतिक समता सप्ताह साजरा

जि.प.शाळा येरगाव व पळसगाव जाट चा पुढाकार समग्र शिक्षा,समावेशित शिक्षण, पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत  दि. ७  डिसेंबर २०२१ ला दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच समान संधी, हक्क, अधिकार देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता व जाणीव जागृती करण्याकरिता केंद्रस्तरीय जागतिक समता सप्ताह कार्यक्रम घेऊन विविध स्पर्धांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात दिव्यांगाचे प्रेरणास्थान लुईस ब्रेल व हेलन केलर  प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण  करुन करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येरगाव

शाळेत संगीता कुंभारे स. शि.  तर पळसगाव शाळेत संगीता बक्षी स.शि.यांनी केले

प्रास्ताविक योगेश विंचूरकर विशेष शिक्षक गटसाधन केंद्र पंचायत समिती सिंदेवाही यांनी करून जागतिक समता सप्ताहाची रुपरेषा समजावून सांगितली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने

सागर शंभरकर केंद्र प्रमुख पळसगाव जाट , अंजली करंबे, उ.श्रे. मुख्याध्यापक पळसगाव

जाट ,अनिता मसराम स.शि, संगिता बक्षी स.शि,माया कोडा पे स.शि, वर्षा बदकमवार स.शि, संगिता कुंभारे स.शि तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते.

वरील मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती येणारे वेगवेगळे अनुभव व्यक्त केले. विविध स्पर्धा-गीत गायन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा, संगीत खुर्ची यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गट समूह केंद्र, पळसगाव जाट कडून बक्षीस वितरण ( बुक व पेन) करून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

प्रतिनिधी: राहुल भोयर,ब्रम्हपुरी-चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या