महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तसेच RMC क्लब द्वारा आयोजित भव्य हाप पिच क्रिकेट स्पर्धा संपन्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तसेच RMC क्लब आयोजित भव्य हाप पिच क्रिकेट स्पर्धा चा आज निरोप समारंभ जिल्हा परिषद शाळेच्या आवारात खंडाळा येथे पार पडला..
कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी श्री सुरज शेंडे तालुकाध्यक्ष, श्री दिपक मेहर शहर अध्यक्ष, श्री नंदकिशोर राखडे उपसरपंच, श्री अमरदिप राखडे ग्रामपंचायत सदस्य, श्री पवन गायगवळी तसेच खंडाळा मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रथम पारितोषिक चादंगाव येथील बंजरग क्रिकेट क्लब यांना ११,००१ हजार रुपये, श्री सुरज शेंडे यांच्या कडून, तर दुसरे पारितोषिक श्री आर. एम. सी क्रिकेट क्लब खंडाळा ७००१ रुपये ,मनसे शाखा खंडाळा कडून तसेच तिसरे पारितोषिक ५००१ श्री नंदकिशोर राखडे उपसरपंच यांच्या कडून देण्यात आले.
त्यासोबतच उत्कृष्ट चषक सुध्दा देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष सुरज शेंडे बोलतांना पुढच्या वर्षी मोठ्या बक्षीसाचे पारितोषिक देणार तसेच येणाऱ्या जानेवारी महिन्यात ब्रह्मपुरी मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन मनसे तर्फे करण्यात येईल असे यावेळी सांगितले.
प्रतिनिधी राहुल भोयर, ब्रम्हपुरी/चंद्रपूर.
0 टिप्पण्या