Advertisement

प्राचार्य डॉ.अझिझुल हक यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयात निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन

प्राचार्य डॉ.अझिझुल हक यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयात निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ. अझिझुल हक नियत वयोमानानुसार दि. 31 ऑक्टो. 2021 रोजी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले त्या प्रित्यर्थ महाविद्यालयातील सत्कार समितीद्वारे महाविद्यालयामध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मारोतरावजी कांबळे साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. देवेश कांबळे तथा शिक्षण संस्थेच्या सदस्या प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे विचारमंचावर उपस्थित होत्या.

या प्रसंगी आदरणीय मारोतरावजी कांबळे साहेब यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. अझिझुल हक यांचा शाल,पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि बुद्धमूर्ती देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मारोतरावजी कांबळे साहेब यांनी प्राचार्य डॉ. अझिझुल हक यांच्याशी निगडित जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि महाविद्यालयाशी जुळलेल नात त्यानी सदोदित जपून ठेवण्याचं आवाहन केल.

याप्रसंगी शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. देवेश कांबळे सर यांनी प्राचार्य डॉ.हक सरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला तसेच प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी भावी आयुष्याबद्दल प्राचार्य डॉ. अझिझुल हक यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली मनोगते व्यक्त करून प्राचार्य हक यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन सत्कार समिती प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. सरोज शिंगाडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या