११४ शहीद गोवारी बांधवांना वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर कार्यकारणी सदस्यांनी शहीद गोवारी बांधवाना शहीद स्मारक,गहुहीवरा चौक,आनंद नगर कन्हान इथे मोठया थाटात मानवंदना देण्यात आली.
कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम यांनी शहीद बांधवांवर मार्गदर्शन करत दुर्दैवी घटना आपल्या शब्दात वेथा मांडली 27वर्षा आगोदर 23नोव्हेंबर 1994 ला हिवाळी अधिवेशनात देश स्वतंत्र्या पासून वंचित असणारा गोवारी समाज नागपूर येथे आपल्या हक्क अधिकार, आरक्षण यावर निवेदन मागणीला आलेल्या शांतीपूर्वक मोर्चावर, कुठलीच भेट न देता तत्कालीन सरकार लाठी चार्ज करून हत्याकांड घडवून आणला.
त्या चेंगरा-चेंगरी मध्ये 114 पेक्षा जास्त गोवारी बांधव शहीद झालेत,3वर्षाचा बालकांन पासून 90वर्षाचा वृद्ध तरुण,महिला, पुरुष शहीद झालेत,ही घटना इतकी मानसिक विकृती करणारी होती, अधिकार माघायचे कुणाला, संविधानिक नियमाने आलेल्या गोरगरीब वंचित बांधवांवर अशी हत्या होत असते, तरी देशाचा संविधानावर मोठा विश्वास ठेवत, गोवारी बांधव त्याचा अस्तित्वाची अधिकाराची लढाई लढतच आहेत.
त्यांचा सोबत वंचित बहुजन आघाडी सदैव सोबत आहे, संचालन रजनीश वामन मेश्राम (कन्हान शहर प्रवक्ता) यांनी केले, श्रद्धांजली कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले सह, सुशील कळमकर,कन्हान शहर सदस्य लीलाबाई रंगारी, शैलेश भाऊ ढोके, मनीष नंदेश्वर, छोटेलाल माणिकपुरी, वासुदेव भिमटे, नितीन वागमारे धीरज देवांगन, सूर्यभान वासनिक, सतीश ढबाले.


0 टिप्पण्या