Advertisement

सुरगाणा नगरपंचायत आरक्षण जाहीर

सुरगाणा नगरपंचायत आरक्षण जाहीर 

स‌ुरगाणा(नाशिक): पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा नगरपंचात मधील १७ प्रभागातील सदस्यांसाठी आरक्षण सोडत बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततेत पार पडली.

काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार ओबीसीची जागा आता रहाणार नसून ही जागा सर्वसाधारण करण्यात आली आहे. उर्वरित जागा मात्र आहे तशीच असणार आहे. केवळ ओबीसी जागा खुली करण्यात आली आहे. या आरक्षण सोडत संदर्भात काही हरकत किंवा सुचना असल्यास त्यासाठी १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर पर्यंत त्या करता येणार. या दरम्यान हरकत किंवा सुचना आल्यास त्यावर १७ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाईल.

यावेळी नायब तहसिलदार मोरे, रमेश थोरात, भरत वाघमारे, सचिन महाले, अकिल पठाण, अब्बास शेख, प्रकाश वळवी, दिनकर पिंगळे, कैलास सुर्यवंशी, अर्जुन शिंदे, सोमनाथ पवार आदींसह नगरपंचात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‌सुरगाणा नगरपंचायत आरक्षण पुढीलप्रमाणे :

वार्ड क्रं. १. अनुसूचित जमाती – महिला किंवा पुरुष,व‌ार्ड क्रं. २. – सर्वसाधारण, वार्ड क्रं. ३. अनुसूचित जमाती – महिला, वार्ड क्रं. ४.अनुसूचित जमाती – महिला, वार्ड क्रं. ५. सर्वसाधारण – महिला, वार्ड क्रं. ६. अनुसूचित जाती, वार्ड क्रं. ७. अनुसूचित जमाती – महिला, वार्ड क्रं. ८. सर्वसाधारण – महिला किंवा पुरुष, वार्ड क्रं. ९. सर्वसाधारण – खुला, वार्ड क्रं. १०. अनुसूचित जमाती – महिला, वार्ड क्रं. ११. अनुसूचित जमाती – महिला, वार्ड क्रं.१२. अनुसूचित जमाती- खुला, वार्ड क्रं. १३. सर्वसाधारण – महिला, वार्ड क्रं. १४. अनुसूचित जमाती – खुला, वार्ड क्रं. १५. अनुसूचित जमाती – खुला, वार्ड नं. १६. सर्वसाधारण – महिला,वार्ड क्रं. १७. सर्वसाधारण महिला

प्रतिनिधी – किशोर जाधव, सुरगाणा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या