Advertisement

२६/११ मुंबई आतंकी दहशत हल्ल्यात शहिदांना व निष्पाप नागरिकांना दिली श्रद्धांजलि

शहिदांना व निष्पाप नागरिकांना दिली श्रद्धांजलि

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे २६/११ शहिद दिवस निमित्य शहिदांना श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.

२६ नोव्हेंबर २००८ ला लश्कर च्या १० दशहतवाद्यांनी मुंबई च्या ताज हाॅटेल मध्ये हल्ला केला होता . या भाड हल्ल्यात १८ सुरक्षाकर्मी व १५० निष्पाप नागरिक शहिद झाले होते. या घटनेला २६ नोव्हेंबर २०२१ ला १३ वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , महेंद्र साबरे , भरत सावळे , महादेव लिल्हारे , महेश शेंडे , कामेश्वर शर्मा , शाहरुख खान , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , अक्षय फुले , शुभम मंदुरकर सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या