केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढी विरोधात ब्रम्हपुरी तालुका युवासेनेचे सायकल रॅलीचे आंदोलन
ब्रम्हपुरी: दि ३११०२०२१ ला युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे,युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात युवासेनेचे राज्यव्यापी सायकल रॅलीचे आंदोलन करण्यात आले
आज ब्राह्मपुरी तालुका युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दर वाढी विरोधात युवासेना जिल्हा विस्तारक मा.नित्यानंदजी त्रिपाठी साहेब युवासेना जिल्हा प्रमुख मा.हर्षलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी येथे झाशी राणी चौक ते ख्रिस्तानन्द चौक येथे सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध करण्यात आल्या, बहुत हुई महेगाई की मार होश मे आवो मोदी सरकार
२०१४ला देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी बहुत हुई महेगाई की मार : अब की बार मोदी सरकार
अशी भाषणबाजी करत केंद्रात सत्तेवर आले देशवासियांना अच्छे दिन चे स्वप्न दाखवली मात्र प्रत्यक्षात देशाच्या इतिहासात कधी नाही पाहिलेली इंदन दरवाढ याचं मोदी सरकारच्या काळात देशवासियांना पाहायला मिळाली चार दिवसावर दिवाळी सारखा सण आहे मात्र या सरकारच्या दरवाढी मुळे सामान्य जनता होरपळून गेली आहे रोज गॅस,पेट्रोल,डिझेल ची दरवाढ होत आहे याचं विरोधात ब्रम्हपुरी तालुका युवासेने तर्फे केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात निदर्शने देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मा.नरूभाऊ नरड,शिवसेना शहर प्रमुख मा.किशोरभाऊ चौधरी, माजी तालुका प्रमुख डॉ सागर माकडे,युवासेना तालुका प्रमुख आकाश शेंद्रे, युवासेना शहर प्रमुख अमोल माकोडे,युवासेना शहर संघटक तेजस चौधरी,उपशहर प्रमुख आशिष गाडलेवार,सौरभ सोनटक्के, पंकज भोयर,राहुल टोंगे, अमर राऊत,गणेश लांजेवार,जिशांत भानारकर,अनिकेत नवघडे, अनिकेत नेवारे,पार्थ लोणारे,आर्यन सिंघम,आयुष तलमले,दुशांत राऊत,आदित्य महाजन,चेतन मूलताने, प्रीतम बनपूरकर,अथर्व उरकुडे आधी शिवसेना युवासेना पदाधिकारी व युवसैनक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी: राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)
0 टिप्पण्या