गट ग्रामपंचायत तळवाडा येथे ग्राम GPDP आराखडा अंतर्गत ग्रामसभा संपन्न
शहापुर शहापुर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तलवाडा येथे सन 2021-22ची ग्रामसभा शुक्रवार दि.22/10/2021रोजी सकाळी 11:00 वाजता विठ्ठल रखुमाई मंदिर तळवाडा येथे ठेवण्यात आली होती.
त्यामध्ये आमचा गांव, आमचा विकास GPDP सन 2022-23चा आराखडा तयार करणे, जलजिवन कृषी आराखडा, महात्मा गांधी रोह्यो आराखडा,प्रधानमंत्री आवास योजना ड यादी वाचन करने, शासकीय आश्रम शाळा सुरू करने, आलेले शासन निर्णय व परिपत्रक वाचन करणे तसेच आयत्या वेळी येणारे विषय यावर मा.अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत तलवाडा ग्रामसेवक श्री.दांडकर,प्रशासक अनिल दिवाण, माजी सरपंच अंकुश बरतड, ग्रामपंचायतमधिल जि.प.शाळेचे शिक्षक श्री.नामदेव वेखंडे सर, सचिन देसले सर, अंबादास शिंदे सर, महेश टवरे सर, कृषी अधिकारी सुरशे, वनकर्मचारी श्री.सहारे, श्री.भोइर, सौ.देसले मँडम, गांडुळवाड आश्रम शाळेचे शिक्षक चौधरी सर, अधिकारी सर, अॉपरेटर भारती भोइर, मोबिलायजर अलका बरतड, ग्रामपंचायत शिपाई श्री.सुनिल सोनवणे,हिरामण खोडका, बुधाजी बरतड,बुधा धुपारी, रविंद्र मराडे,अतिष मराडे, पोलिस पाटील मच्छिंद्र मराडे, किशोर गायकवाड, सखाराम बरतड, रमेश बरतड, रमेश तेलम, व विकास बरतड, तसेच ग्रुप ग्रामपंचायत तलवाडा मधील ग्रामस्थ मोठेया प्रमाणात उपस्थिति दाखवुन ग्रामसभा चांगल्याप्रकारे पार पाडण्यात आली. गट ग्रामपंचात तळवाडा येथे ग्राम GPDP आराखडा अंतर्गत ग्रामसभा संपन्न.
प्रतिनिधि:- रविंद्र मराडे.


0 टिप्पण्या