Advertisement

ब्रह्मपुरी नगर परिषदेचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

ब्रह्मपुरी नगर परिषदेचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

ब्रह्मपुरी:- नागेश्वर नगर  मालडोंगरी रोड ब्रम्हपुरी येथे दहा वर्षा पासून सुशिक्षित लोकांची पक्की लोकवस्ती आहे. व इतर मालमत्ता धरकांन प्रमाणे येथील मालमत्ता धारक सुध्धा नगर परिषदेला कर देतात.त्याचाच एक भाग म्हणून अश्या वस्त्यां मध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र अजून पर्यंत या भागात बऱ्याच ठिकाणी ना नाली धड ना रोड अशी अवस्था झाली आहे. याचा त्रास या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.

 

याबाबत नालीचे बांधकाम करण्यात यावे याकरिता ब्रम्हपुरी नगर परिषदेला दिनांक ०९/०८/२०२१ ला परिसरातील नागरिकांना कडून निवेदन देण्यात आले व यापूर्वी सुद्धा बरेच वेळा निवेदने देण्यात आले.यावर  थातुर मातुर   ऊपाय योजना म्हणून

दोन महिने अगोदर  माती उपसून  कच्चा नालीचे काम करण्यात आले. मात्र या नालीचे उतार काढण्यात आले नाही व मध्ये  मध्ये खोल चढ अशा पद्धतीने नालीचे काम करण्यात आले व यामुळे पावसातले पाणी व घरातील सांडपाणी या नालीमध्ये जमा होतो व हा पाणी कुठेच वाहत नसल्यामुळे याच ठिकाणी साचून राहतो.साचलेल्या पाण्यात  शेवाळ जमा झाली आहे

आणि त्यामुळे या पाण्यामध्ये मलेरिया व डेंगू चे विषाणू (मच्छर) तयार होऊन या परिसरात डेंग्यू व मलेरिया यासारख्या रोगाचा  प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात  यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिनिधी: राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या