ब्रम्हपुरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश व आढावा बैठक संपन्न
ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली महिला जिल्हाध्यक्ष सौ बेबीताई उईके व राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री जगदीश जुनघरे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीचे औचित्य साधून यावेळी किशोर लांबकाने, किरण पिलारे, रामू बनपुरकर,यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केले .जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सदरहू बैठक 17 ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा चंद्रपूर येथे दौरा नियोजित असून जनता कॉलेज चंद्रपूर येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच माजी मुख्यमंत्री माननीय नामदार श्री छगन भुजबळ यांचा दि.18 व 19 ऑक्टोंबर ला चंद्रपूर जिल्हा दौरा होणार आहे त्यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आजची बैठक घेण्यात आली.
यावेळी जगदीश पिलारे विधानसभा अध्यक्ष, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष वासू भाऊ सौदरकर,मनोज कराडे जिल्हा सचिव, दूधराम आकरे किसान सेल अध्यक्ष,अश्विन उपासे तालुका युवा अध्यक्ष, नौशाद सय्यद अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष, मंजुषा ठाकरे महिला जिल्हा सचिव, प्रिया मोटघरे महिला कार्यकारी अध्यक्ष,नरेश बांते, सतीश ठेंगरी, दामोदर डांगे, विनोद दोनाडकर,सुनील मसराम सुभाष उरकुडे प्रफुल्ल नाकतोडे, प्रशांत,बबन ठाकरे,प्रमोद हनवते, उलन ठाकरे, उलम ठाकरे,सुनील तोंडरे, गजानन नवलाखे, जितेंद्र शिऊर्कर, जनता ठेगरी,विवेक वैरागडे, श्री.काटराम, तसेच बरेच कार्यकर्ते उपस्थित होते
ब्रह्मपुरी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली महिला जिल्हाध्यक्ष सौ बेबीताई उईके व राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री जगदीश जुनघरे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी किशोर लांबकाने, किरण पिलारे, रामू बनपुरकर,यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केले .जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन व त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा दुप्पट्टा घालुन त्यांचे स्वागत केले.
प्रतिनिधी:- राहुल भोयर ब्रम्हपुरी/चंद्रपूर
मो.9421815114


0 टिप्पण्या