नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी ‘बेबी केअर किट’ प्रदान
कामठी ता. 20 ऑक्टोबर-एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कामठी च्या वतीने प्रभाग क्र 15 मधील शिवनगर येथिल नवजात बाळाची माता दिक्षा अनिकेत टेंभुरने यांना नगरसेविका संध्याताई रायबोले यांच्या शुभहस्ते बाळाची काळजी घेणारी ‘बेबी केअर किट’ वितरण करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका प्राजक्ता रंगारी,मदतनीस नालंदा रावत उपस्थित होते
एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक 66 येथे प्रसूती पूर्व नोंदणी अंगणवाडी सेविका प्राजक्ता रंगारी यांनी केली होती
नवजात बालक बालिकेचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रसूती नंतर जन्माला येणाऱ्या बालकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक साहित्य असलेली बेबी केअर किट शासन स्तरावर राबविल्या जाते एकात्मिक बाल विकास विभाग योजना कामठी शहर व ग्रामीण भागातील कार्यालयात बेबी केअर किट वितरणा साठी पुरवठा करण्यात आल्या आहेत.
या बेबी केअर किट मध्ये नवजात बालकाचे कपडे, लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, तापमापक यंत्र, अंगाला लावण्याचे 250 मी ली तेल, मच्छरदानी , छोट्या आकाराचे ब्लॅंकेट, लहानशी चटई, 60 मिली श्याम्पू, खेळणी खुळखुळा, नख काटण्यासाठी नेलकटर, हातमोजे,पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लोकरीचा कापड, बॉडी वॉश लिक्विड, व सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग आदी साहित्याचा या किटमध्ये समावेश आहे. आरोग्यासाठी हितकारक अशी ही योजना असून बाळाचा आहार आणि स्वच्छतेबाबत मातांना विशेष काळजी घ्यावी लागते.
स्वच्छता नसली तर विविध आजारांना निमंत्रण मिळते. मुले सुदृढ ठेवण्यासाठी मिळालेली किट ही अत्यंत फायदेशीर असल्याचे मत लाभार्थी माता दिक्षा अनिकेत टेंभुरने यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी जयंत डोंगरे कामठी
0 टिप्पण्या