वाळू तस्करी रोखण्यासाठी, भारतीय युवा पॅंथर संघटनेचे ब्रह्मपुरी तहसीलदार यांना निवेदन
ब्रह्मपुरी तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसताना वाळूतस्कर ब्रह्मपुरी येथील राजकीय नेत्याच्या व त्यांच्या चेले चपाटाच्या भयमुक्त आशीर्वादाने बिना नंबर प्लेट च्या ट्रॅक्टर वाहनाने अवैधरित्या वाळू माती मुरुम व इतर गौण खनिज उपसा करून शासनाच्या मालमत्तेची लुटमार करून आपले घर भरण्याचे काम करीत आहेत हे सर्रासपणे सुरू असताना ब्रह्मपुरी येथील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग करीत आहेत, यांना जाग आणण्यासाठी व वाळू तस्करावर आळा घालण्यासाठी किंवा फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी ब्रह्मपुरी, येथील भारतीय युवा पॅंथर संघटना च्या वतीने मा.तहसीलदार मॅडम ब्रह्मपुरी, एस.डी.ओ.साहेब ब्रह्मपुरी. पोलिस स्टेशन ब्रम्हापुरी, उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्रह्मपुरी यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटना ,महाराष्ट्र राज्य, विदर्भ प्रमुख, रुपेश देशमुख ,व भारतीय युवा पॅंथर संघटना अध्यक्ष सुभाष नागतोडे ब्रह्मपुरी भारतीय युवा पॅंथर संघटना नागभीड तालुका अध्यक्ष, सौ सपना ताई कांबळे, उपाध्यक्ष सौ शालू ताई दुर्वे , सचिव गोपाल मस्के ,सदस्य सौ शालू ताई दाकोडे, सौ वनिता ताई मेश्राम सौ बेबीताई ठवरे , सौ मंगलाताई ब्राह्मणकर सौ अंबिका ताई ,धर्मा बदन सौ शारदा ठोंबरे सौ अंजली भेंडारकर ,आणि भारतीय युवा पॅंथर संघटना ब्रह्मपुरी , तालुका उपाध्यक्ष सौ,सुनीताताई पेंदाम , ब्रम्हापुरी ,ग्रामीण कोषाध्यक्ष गणेश राऊत ,व ग्रामीण कोषाध्यक्ष रोहित सहारे ,व ग्रामीण कोषाध्यक्ष अश्विन कुंभारे, ब्रह्मपुरी तालुका सचिव सौ माधुरीताई बेदरे सदस्य सौ हिरकणी ताई राऊत , सौ मीनाक्षीताई नागतोडे, सौ वर्षा ताई तोंडरे , सौ माधुरीताई नागतोडे प्रतिक नागतोडे प्रणय नागतोडे निखील धोटे सौ निरुपा ताई भुते सौ प्रतिभाताई धोटे, सौ अस्मिता ताई शेंडगे, सौ निशाताई बुल्ले, परशान डोंगे , मूलचंद धोटे, प्रणय धोटे, फाल्गुन नाकतोडे , प्रवीण दिवटे, अमर मडावी, संदीप ठाकरे, भारतीय युवा पॅंथर संघटना जर का येत्या दहा दिवसात निवेदनाची दखल घेण्यात आली नाही तर भारतीय युवा पॅंथर संघटनेच्यावतीने आपल्या कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी व भारतीय युवा पॅंथर चे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिनिधी – राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)


0 टिप्पण्या