माळशेज घाटातील काचेच्या पुलाच्या नियोजित जागेची जिल्हाधिकारी यांच्याकडून पहाणी
माळशेज:- माळशेज घाटात होणा-या काचेच्या पुलाच्या नियोजीत जागेची मुरबाड व तालुक्यातील पळू व सिंगापूर येथे सुरु असलेल्या पर्यटन स्थळावरील विकास कामाची ठाणे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पहाणी करून कामाचा आढावा घेतला, असी माहीती जिल्हा कामगार मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुहास मोरे यांनी दिली.

पळू आणि शिंगापूर या गावा लगत असलेल्या पर्यटन क्षेत्रात हजारो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. याच परिसराची व सुरू असलेल्या विकास कामाची पहाणी करण्यासाठी बुधवार दि.6 आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी मुरबाड येथे वनखात्याच्या वतिने सुरू असलेल्या कामाची पहाणी करून सिंगापूर व पळू या पर्यटन क्षेत्रात सुरू असलेल्या कामाची पाहाणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी रोहीत रजपूत, नियोजन अधिकारी अमोल खंडारे, मुरबाड तहसीलदार संदीप आवारी, जिल्हा कामगार मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुहास मोरे यांच्या समवेत भेट दिली. या भेटीत नार्वेकर यांनी ग्रामस्थाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . पर्यटन क्षेत्रात बांधण्यात आलेल्या पर्यटन निवास स्थाने,तलावाच्या सुशोभिकरण, डोंगरी विकास अंर्तगत बांधण्यात आलेल्या दगडी हाँल व ईतर विकास कामाची पहाणी करून आढावा घेतला. या वेळी या परीसरातील ग्रामस्थ ऊपस्थीत होते. त्यांच्याही बरोबर जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली.
प्रतिनिधी:- राजेश भांगे टोकावडे


0 टिप्पण्या