वडगाव शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गुलाबपुष्प,चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वाग
वडगाव मावळ:-कोरोना वैश्विक महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आल्या आहे. वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वडगाव शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फेसमास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्यात आले.दीर्घ सुट्टीनंतर शाळा चालू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यावेळी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे,स्थानिक शिक्षण समिती सदस्य मनोजभाऊ ढोरे,नगरसेवक प्रविण चव्हाण,नगरसेवक किरण म्हाळसकर,विनायक भेगडे,रविंद्र म्हाळसकर,शेखर वहीले,कल्पेश भोंडवे ,शिवा कटनाइक आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या