“शासन आपल्या दारी” या महाराजस्व अभियानामध्ये कशाळगावातून प्रचंड प्रतिसाद
वडगाव मावळ:- मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून मावळ मधील प्रत्येक गावांमध्ये महाराजस्व अभियानामार्फत “शासन आपल्या दारी” राबविण्यात आले आहे. या अभियानातून आधार कार्ड,कोरोना लसीकरण,विवाह नोंदणी दाखले, ८ अ चे उतारे,जन्म दाखले, मृत्यू प्रमाणपत्र,मनरेगा,
रेशन कार्ड,अन्न सुरक्षा लाभार्थी, विविध कृषी योजना,महिला बाल कल्याण, पशुवैद्यकीय सेवा,शालेय शिक्षण व इतर विविध योजनांचा लाभ घेण्यात येत आहेत.
या अभियानात उद्योजक सुधाकर शेळके, नगरसेवक संदीप शेळके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ,मारुती असवले, समीर कदम, नवनाथ पडवळ, रवींद्र वायकर,दिगंबर आगिवले, नवनाथ आंबेकर, माजी सरपंच विठ्ठल जाधव, माजी आदर्श सरपंच शरद जाधव, माजी उपसरपंच तुकाराम जाधव, ,सरपंच मारुती खामकर, उपसरपंच तुळशीराम जाधव, माऊली जाधव,विश्वनाथ जाधव, आदी उपस्थित होते.
कशाळगावामध्ये या अभियानातून १०८८ लोकांना लाभ मिळाला गावामध्ये १ महिन्यापासून जनजागृती, लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना विविध योजनांची माहिती तसेच विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम माजी सरपंच विठ्ठल जाधव,शरद जाधव, माजी उपसरपंच तुकाराम जाधव, रामदास जाधव, सुखदेव जाधव, बाळासाहेब जाधव, नवनाथ जाधव, प्रशांत जाधव, शंकर जाधव, मंगेश जाधव, भाऊ सुतार,नरेश जाधव आदींनी काम पाहिले.
तसेच उपस्थित अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला तसेच ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानन्यात आले.
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या