Advertisement

भाजपा कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचावे: चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचावे: चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन,कामठी भाजपा ची कार्यकारिणी घोषित

कामठी: कामठी प्रतिनिधी 25 ऑक्टोबर- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचून त्यांचे अश्रु पुसण्याचे काम करावे असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले

भारतीय जनता पार्टी कामठी शहर ची कार्यकारणी प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, भाजपा उद्योग व व्यापार आघाडी प्रदेश सदस्य अजय अग्रवाल, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अजय बोढारे, भाजयुमो नागपूर जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, भाजपा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष दिलावर खान आणि भाजपा अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष अंबादास उके यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जाहीर करण्यात आली.

 

 

भाजपा कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचावे

यावेळी भाजपा कामठी शहर अध्यक्ष म्हणून संजय कनोजिया, कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल, महिला आघाडी अध्यक्ष प्रिती कुल्लरकर,कार्याध्यक्ष संगीता अग्रवाल,भाजयुमो कामठी शहराध्यक्ष पंकज वर्मा, अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष विक्की बोंबले, भाजप ओबीसी आघाडी अध्यक्ष चंद्रकांत राऊत,भाजपा अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष प्रकाश नेटी, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष नीतू दुबे,भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष नरेश पारवानी,भाजपा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष वसी हैदरी,भाजपा भटक्या जाती आघाडी अध्यक्ष म्हणून यांची व त्यांच्यासह महामंत्री म्हणून प्रत्येकी चार मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी सुनील खानवानी,उज्वल रायबोले,राज हाडोती, विनोद संगेवार, मंगेश यादव,रमेश वैद्य,राजेश देशमुख, कपिल गायधने,विजय कोंडूलवार,कमल यादव,धर्मेंद्र पैगवार,नगरसेवक लालसिंग यादव,प्रतीक पडोळे, संध्या रायबोले, सुषमा शिलाम,सतीश जयस्वाल,प्रमोद वर्णम,प्रवीण आगाशे,राहुल निंबरते,योगिता अतकर यांनी सहकार्य केले

प्रतिनिधी: जयंत डोंगरे,कामठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या