युवा स्वास्थ मिशन योजने अंतर्गत मावळ तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ०२ नोव्हेबरपर्यंत लसीकरण पुर्ण करण्याचे मावळ नोडेल अधिकारी प्रा.संतोष शिंदे यांचे आवाहन
वडगाव मावळ (पुणे) युवा स्वास्थ्य मिशन योजना अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कला वाणिज्य व बी.बी.ए.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यानसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
मावळ तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण दिनांक 25 ऑक्टोंबर ते ०२ नोव्हेंबर ह्या सप्ताहामध्ये पुर्ण करण्याचे आवाहन सर्व महाविद्यालयाला मावळ नोडेल अधिकारी प्राध्यापक संतोष शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी प्रा. अशोक गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, डॉ.शितल दुर्गाडे,प्रा. शितल शिंदे, प्रा. अनिल कोद्रे,प्रा. योगेश जाधव,प्रा.गजानन वडुळकर,प्रा. रोहिनी चंदनशिवे, अक्षय औताडे वैदकीय अधिकारी डॉ.निफाड व त्यांच्या सहकारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ नोडेल अधिकारी प्रा. संतोष शिंदे यांनी केले
प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या