Advertisement

खड्यात झाडे लावून! केली नढई-नारिवली रस्ता संघर्ष समितीची स्थापना

खड्यात झाडे लावून! केली नढई-नारिवली रस्ता संघर्ष समितीची स्थापना

स्वस्तिक नावाच्या एका मोठ्या  स्ट्रोन क्रेशर कंपनीच्या अवजड डंपर वाहतुकीने  गेल्या दोन वर्षात नढई – नारिवली  रस्ताची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करने प्रवाशांना जिकरिचे व धोक्याचे बनले आहे.अगोदरच अरुंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अनेक लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात अनेक जागरुक नागरिकांनी , पञकारांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाने स्ट्रोन क्रेशर विरोधात व पडलेल्या खड्यां विरोधात  कोणतिही ठोस कारवाई केली नाही म्हणून आज भुवन येथे झालेल्या सभेमध्ये   परिसरातील नागरिक व प्रवासी यांच्या सुरक्षेचा विचार करता या परिसरातील भुवन , दहिगाव , जामघर , शेलारी , म्हाडस , बांधिवली , नारिवली , देहरी येथिल ग्रामपंचायत सरपंच व काही होतकरु तरुण , पञकार एकञ येऊन नढई – नारिवली रस्ता संघर्ष समितीने स्थापना केली असून प्रशासनाचा निषेध म्हणुन यावेळी रस्त्यातील  खड्यातच समितीची स्थापना करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

यापुढे या रस्ताच्या संदर्भात सर्व निर्णय , पुढिल आंदोलनाची दिशा संघर्ष समितिच्या माध्यमातून केले जातील असे यावेळी सर्वानुमते  ठरविण्यात आले आहे.

प्रारतिनिधी: जेश भांगे, मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या