तळेगाव ते कुडाची वाडी रस्त्याची चाळण! गावकरी मेटाकुटीला
कुडाची वाडी ते तळेगाव रस्त्याची दुरवस्था झालेली असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाले असून याबाबत गावकरी सताप्त झाले आहेत. येथील पुलाला कटाडे नसल्याने अनेक वेळा अपघात झाले आहे.
गेल्या 20 वर्षा पासून कुडाची वाडी हा रस्ता उखडून गेला असून अजूनही या रस्त्या बाबत कोणताही लोक प्रतिनिधी मनावर घेत नसल्याने गावकरी सताप्त झाले असून दिवाळी परत हा रस्ता जर तयार झाले नाही तर गावात एक लोक प्रतिनिधी फिरकू देणार नाही असे येथील ग्रामस्थ राजा शिद.कैलास शिगवा.शकर दरोडा.अशोक दरोडा.रघूनाथ दरोडा.यांनी पत्रकार राजेश भांगे यांच्या कडे आपली भावना व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी:- राजेश भांगे. मुरबाड/ठाणे


0 टिप्पण्या