प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथेल वैद्यकिय अधिकारीच्या बेजबाबदारी मुळे कुटुंब-नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी: पिडीत महिलेच्या न्याय हक्क मागणीसाठी वर्धराज पिल्ले अग्रेसर
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे वैद्यकिय अधिकारी यांचे बेजबाबदार पणामुळे गैरअर्जदार वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान यांची सखोल चौकशी करून अर्जदार यांना उचित न्याय देण्यात यावा: श्री वर्धराज पिल्ले (शिवसेना- उपजिल्हा प्रमुख,नागपूर ग्रामीण)
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे वैद्यकिय अधिकारी यांचे बेजबाबदार पणामुळे दिनांक २५/०९/२०२१ रोजीचा घडलेल्या प्रकरणाबद्दल गैरअर्जदारांवर सखोल चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करून उचित न्याय मिळणेबाबत कन्हान पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
गैरअर्जदार श्री.नाईकवर, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान यांच्या वर सखोल चौकशी करून कायदेविषयक उचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी श्री वर्धराज पिल्ले (उपजिल्हाप्रमुख ,नागपूर ग्रामीण) यांनी मागणी केली आहे.
उपरोक्त विषयाचा अनुषंगाने दिनांक २५/०९/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता श्रीमती अनुराधा फजित टोहने यांचे कुटुंब-कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली होती व शस्त्रक्रिया करत्याक्षणी गैरअर्जदार वैद्यकिय अधिकारी श्री.नाईकवर यांचा हातानी श्रीमती अनुराधा फजित टोहने यांचा पोटाची नश कापली गेली,परंतु गैरअर्जदारानी श्रीमती अनुराधा फजित टोहने व त्यांच्या नातेवाईकांना यांची BP वाढल्यामुळे यांना मेडिकल हॉस्पिटल नागपूर ला हलविण्यात यावे व त्याठिकाणी यांना भरती करावे असे सांगितले गेले होते. तसेच श्रीमती अनुराधा फजित टोहने स्ट्रेचरवर तसेच असता २ ते ३ तास पडून राहिले आणि शरीरातून खूप रक्त वाहत होते.
परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र,कन्हान येथील गैरअर्जदार वैद्यकिय अधिकारी श्री.नाईकवर व इतर अधिकारी यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १०८ एम्बूलंस उपलब्ध असून सुद्धा वैद्यकिय अधिकारी यांनी साध्या एम्बूलंस मध्ये मेडिकल हॉस्पिटल,नागपूरला हलविले.
व गैरअर्जदार यांनी भर्ती करून त्याठीकानाहून तसेच निघून गेले. यांच्या द्वारे करण्यात आलेली कुटुंब-कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाली व यांचे कुटुंब-कल्याण शस्त्रक्रिया पुन्हा कधीच करता येणार नाही असे मेडिकल हॉस्पिटल,नागपूर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
तसेच गेल्या काही महिन्या अगोदर असाच प्रकारची घटना जवाहरलाल नेहरू चिकित्सालय कांद्री येथे सुद्धा प्रशासनाचा बेजबाबदार पणामुळे दिनांक १३/०४/२०२१ ला ४ व्यक्तीचा मृत्यू झाला, याबाबत देखील अनेक पत्रव्यवहार करण्यात आले परंतु आजपर्यंत सदर बाबतीत कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही.
वरील झालेल्या सर्व गैरप्रकारास गैरअर्जदार वैद्यकिय अधिकारी यांच्या बेजबाबदार पणामुळे व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी कर्तव्यात अलगर्जी/बेजाबदारी केल्यामुळे त्यांचा जिवाशी खेळण्यात आले. असे आढळून आले स्पष्ट सांगण्यात येते.
इत्यादी प्रकरणी संबंधित वरील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून गैरअर्जदार यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच यांचे लायसन्स रद्द करून यांना उचित दंडात्मक कार्यवाही करून, पिडीत महिलेले न्याय मिळवून देण्यात यावे, अशी विनंती श्री वर्धराज पिल्ले व समस्त शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी (शिवसेना) यांनी केली.
संबंधित विषयाची माहिती प्रत देण्यात आली.
- मा.मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य
- मा. खा. कृपालजी तुमाने खासदार, रामटेक लोकसभा
- मा. आ. आशिषजी जयस्वाल आमदार, रामटेक विधानसभा
- मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर
- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांना
- मा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन कन्हान
यांना कार्यवाहीस्तव सविनय माहिती सादर करण्यात आली.


0 टिप्पण्या