पालकमंत्र्याच्या हस्ते अध्यावत २३ रुग्ण वाहिकेचे लोकार्पण
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्यावत २३ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पोलिस ग्राउंड, चंद्रपूर येथे दि.०५/१०/२१ ला पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संध्या गुरणुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड १९- च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकेची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे.
तसेच कोरोणा विषाणूच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणि दुर्गम भागातील सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे.
सदर २३ रुग्णवाहिका पैकी २० रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित ३ रुग्णवाहिका जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आज पर्यंत जिल्ह्यात ४७ रुग्णवाहिका व ३० लसीकरण वाहने असे एकूण एकूण ७७ रुग्णवाहिका आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी २० रुग्णवाहिका खनिज निधीतून, ७ रुग्णवाहिका राज्यशासनाकडून,२७ रुग्णवाहिका महापारेषण विभागाकडून तर २३ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
प्रतिनिधी:- राहुल भोयर (ब्रम्हपुरी/चंद्रपूर)


0 टिप्पण्या