क्रांतीवीर बाबूराव पूलेस्वर शेडमाके यांची पुण्यतिथी रायनगर कन्हान मध्ये साजरी.
दि २१/१०/२०२१ गुरुवार ला तिरु सुखलालजी मडावी कन्हान यांचा घरी विर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांची पुण्यतिथी करण्यात आली.स्वातंत्र पूर्व काळात इंग्रजाना सळो की पळो करून सन १८५८ च्या कालखंडात भारतात स्वातंत्र्याची चळवळ ऊभारून क्रांतीची लढा देणारे क्रांतीकारक विर बाबूराव पूलेसूर शेडमाके यांचे पुण्यतिथी रायनगर कन्हान जि नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.
पुण्यतिथी कार्यक्रमाची सूरवात कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरु हरिश उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष) जिल्हा परिषद सदस्य यांचे द्वारा क्रांतीवीर बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात बहूसंख्येने ऊपस्थित असणारे मुलनिवासी गोंडीयन समूहाने क्रांतीविर बाबूराव शेडमाके अमर रहेच्या जयघोष नार्यानी परिसर क्रांतीमय करून सोडला असून कार्यक्रमाचे ऊदघाटक तिरु हरिश भाऊ उईके यांनी विर बाबूराव शेडमाके यांनी केलेल्या क्रांतीची व इतीहासाची माहिती अवगत करून दिली.
उपस्थित जन समूहात होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरूध्द लोकशाही मार्गाने लढा ऊभरावा असे स्पष्ट करून गोंडवाना समाजातील एकतेचे महत्व पटवून दिले त्यानंतर (महाविदर्भ जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष) तिरु संजय सत्यकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन तिरु सोनु मसराम (कन्हान शहरं अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) त्याच बरोबर गोंडवाना गणतंत्र पार्टी चे नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमात प्रामूख्याने ऊपस्थित तिरु सुखलालजी मडावी (महाराष्ट्र उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) तिरु जी मडावी ( नागपूर जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) तिरु संजय सत्यकार (अध्यक्ष महाविदर्भ शेतकरी संघटना) तिरु विनय यादव ( नगरसेवक कन्हान नगर परिषद) तिरु राजेश फुलझेले , तिरु भारत पगारे, तीरु खुशाल बनसोड, तिरु शंकर ईनवाते, तिरु संदीप परते, तिरु अनिल पंधराम, तिरु बंडूजी ईरपाते. तिरु रजनिश मेश्राम, तिरु अनंतराम टेकाम, तिरु जे.डी. भलावी, तिरु राजवीर मडावी, तिरु अनिल मरस्कोले, तिरु पप्पू मरकाम, तिरु राजेश टेकाम, तिरु अरुण जगणेकर, तिरु सुरज वरखडे, तिरु शिवचरण कुंजाम, तिरु मनोहर परतेती, तिरुमाय रत्ना मडावी, सरस्वती उईके, सुशिला ईनवाते, संगिता कुंवर, केशर सिरसाम, सरोज मरस्कोले, शालु सुर्यवंशी, कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्य क्रमात उपस्तीथ समस्त मान्यवरांचे सुखलाल मडावी यांनी आभार व्यक्त करून, संदीप परतें यांनी आभार प्रदर्शन केले.


0 टिप्पण्या