डोळखांब विभागातील तलवाडा गावामध्ये रानगवा चे दर्शन
शहापुर: डोळखांब विभागातील तलवाडा गावामध्ये दि. 22102021रोजी दुपारच्या वेळेत तलवाडा गावामध्ये रानगवा आढळुन आल्याने तलवाडा गावामधील ग्रामस्थांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने नागरिकांना वाघ बिवळ्या ची भिती असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हाण केले असताना,काल अचानक तलवाडा गावामध्ये रानगवा आढळुन आल्याने नारिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे. तलवाडा गावामध्ये रानगवा आल्यांतर पोलिस पाटील मच्छिंद्र मराडे यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली, परंतु वनविभागाचे कर्मचारी येइपर्यंत रानगवा तलवाड्यावरून हिंगळुदच्या जंगलामध्ये निघुन गेला. त्यामुळे नागरिकांना असे वाटते कि वनविभागानेही याकडे काळजीनेलक्ष द्यावे.
प्रतिनिधि: रविंद्र मराडे


0 टिप्पण्या