Advertisement

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया,ब्रम्हपुरी मध्ये विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचा दुसरा कॅम्प संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया,ब्रम्हपुरी मध्ये विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचा दुसरा कॅम्प संपन्न

ब्रह्मपुरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे महाराष्ट्र शासन  व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या निर्देशानुसार दि. 28 ऑक्टो. 2021 रोज सोमवारला सकाळी 9.00 ते 12.00 या दरम्यान  महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती, महिला अध्ययन   केंद्र आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामीण रुग्णालय ब्रम्हापुरी यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन स्तरावर 18 वर्षांवरील विद्यार्थी यांच्याकरिता कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसिकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अझिझुल हक,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण  संस्था चांदा (ब्रम्हपुरी) चे सचिव, प्रा. डॉ  देवेश कांबळे ,  संस्थेच्या सदस्या तथा महिला अध्ययन केंद्र आणि  महिला तक्रार निवारण समितीतीच्या प्रमुख प्रा. डॉ स्निग्धा कांबळे , विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा. तुफान अवताडे, प्रा.योगिता रामटेके प्रामुख्याने  उपस्थित होते.

या लसीकरण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी   महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरीचे कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी आदर्श अमृतकर, शंकर भोयर, संजीवनी निमगडे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या